स्तन कर्करोग, एआय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ३-डी मॅमोग्राम

    18-Sep-2026
Total Views |

Cancer 
न्यूयाॅर्क, 17 सप्टेंबर (वि.प्र.) :
महिलांमधील स्तनांच्या कर्कराेगाचे लवकर निदान आणि उपचारांच्या क्षेत्रात एक आश्वासक यश मिळाले आहे. न्यूयाॅर्क विद्यापीठ आणि त्याच्या पर्लमुटर कॅन्सर सेंटरच्या संशाेधकांनी एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित साधन विकसित केले आहे. हे साधन महिलांच्या जुन्या आणि अलीकडील 3-डी मॅमाेग्राम स्कॅनचे विश्लेषण करून पुढील 5 वर्षांत स्तनांचा कर्कराेग हाेण्याच्या धाेक्याचा अचूक अंदाज लावू शकते.
 
‘अमेरिकन जर्नल ऑफ राेएन्टजेनाेलाॅजी’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, रुग्णाच्या क्रमिक ‘लाेग्निट्युडीनल 3-डी मॅमाेग्राम स्कॅन’चे मूल्यांकन करणारी ही नवीन प्रणाली, एकल मॅमाेग्राम किंवा पारंपरिक कॅल्क्युलेटर पद्धतींपेक्षा अधिक अचूक परिणाम देते. छधण-ऊठझ नावाचे हे डीप-लर्निंग एआय माॅडेल, 2016 ते 2020 या कालावधीतील 1,61,165 महिलांच्या 3,13,531 वार्षिक 3डी मॅमाेग्रामच्या डेटाबेसवर आधारित तयार करण्यात आले आहे. पारंपरिक साधने केवळ रुग्णाचे वय, आनुवंशिक इतिहास किंवा काैटुंबिक इतिहासावर अवलंबून असतात. याउलट, हे एआय माॅडेल कालांतराने स्तनांच्या ऊतींमधील सूक्ष्म बदलांचा मागाेवा घेते.
 
या संशाेधनातून ऊतींच्या घनतेबद्दलही महत्त्वाची माहिती समाेर आली आहे. आतापर्यंत असे मानले जात हाेते की, ज्या महिलांमध्ये घनता जास्त असते त्यांना कर्कराेगाचा धाेका नेहमीच जास्त असताे.
 
परंतु, एआयने हा नियम चुकीचा ठरवला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने, डाॅक्टर प्रत्यक्ष धाेक्याच्या आधारावर पुढील चाचण्या सुचवू शकतील. त्यामुळे अनावश्यक आणि महागड्या चाचण्या टाळता येतील.