2. पूजा- हाेम-हवन आदी क्रिया आणि देवीदेवतांचे पूजन, पवित्र हाेमात उत्तम वृक्षाच्या समिधांचे हवन करून मनःशुद्धी आणि वातावरणशुद्धी साधल्यानंतर हे विधी ज्या पुराेहिताकडून करवून घेतले जातात, त्याची तृष्टी, त्याची यथाेचित पूजा करून त्याला दानदक्षिणा देऊन आशीर्वाद घेणे जरुरी असते. त्याशिवाय यज्ञफल प्र्राप्त हाेत नाही.
3. भाव ः काेणतीही क्रिया करण्यामागे असणारा भाव, हेतू हा महत्त्वाचा असताे. दुष्ट इच्छा ठेवून किंवा स्वार्थप्रेरित हाेऊन केलेल्या कामात यश येत नाही. म्हणून भाव-सद्भाव महत्त्वाचा.
बाेध ः खरी श्रद्धा, भ्नती असेल तरच कार्यसिद्धी हाेते. म्हणतात ना ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव!’’अगदी षाेडशाेपचारे जरी देवाची पूजा केली आणि मन मात्र वाईट मार्गाकडे असेल तर त्याचे फळ मुळीच मिळत नाही. याउलट मनाेमन देवाला भजणाऱ्यासाठी (कुठलेही कर्मकांड न करता) देव न्नकीच धावून येईल.