गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याचाराज्य सरकारचा प्रयत्न : आशिष शेलार

ganeshotsav-unesco-cultural-heritage

    17-Sep-2026
Total Views |
 
Ganeshotsav
मुंबई, 16 सप्टेंबर (आ.प्र.) :
सार्वजनिक गणेशाेत्सवाची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जागतिक व्यासपीठावर अधाेरेखित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या सहकार्याने गणेशाेत्सवाचा युनेस्काेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
 
वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळ, रेक्लेमेशन येथे ङ्गइरिरि.ेीसफ आणि महाराष्ट्र गणेशाेत्सव राज्य महाेत्सवाच्या अधिकृत लाेगाेचे थाटामाटात अनावरण करण्यात आले.
 
यावेळी अभिनेते रितेश देशमुख, नेहा पेंडसे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, श्रीपाद आष्टीकर आदी मान्यवर उपस्थित हाेते. ङ्गइरिरि.ेीसफ या डिजिटल मंचावर देश-विदेशातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्याद्वारे जगभरातील भाविकांना महाराष्ट्राच्या या समृद्ध उत्सवपरंपरेत सहभागी करून घेता येईल, असा विश्वास शेलार यांनी व्य्नत केला. यावेळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला 12 फुटी भव्य माेदकाचा फिरता चित्ररथ सादर करण्यात आला. गणरायाची प्रतिमा, लाेकमान्य टिळक आणि गणेशाेत्सवाच्या परंपरेशी निगडित कलात्मक बाबींचा समावेश असलेला हा चित्ररथ वर्षभर राज्यभर फिरवण्यात येणार असून, त्यातून राज्य महाेत्सवाची व्याप्ती, लाेककला आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन व प्रसार केला जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.