दीर्घकाळ करू शकाल ध्यानधारणा

    17-Sep-2026
Total Views |

Meditation

ध्यान वा माइंडफुलनेसचा अभ्यास करताना बहुतेकजण लक्ष विचलित हाेण्याची तक्रार करतात. अनेकांचे असेही मत आहे की, ते लवकर बाेअर हाेतात वा दीर्घकाळ ती सवय टिकवून ठेवू शकत नाहीत. वर्टवेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या टीमने चार प्रमुख कारक ओळखले आहेत. यांच्या मदतीने ध्यानाचा अभ्यास दीर्घकाळपर्यंत चालू ठेवू शकता.
 
साधनांची मदत
यात मेडिटेशन अ‍ॅप, ऑडियाे, पुस्तके वा रिमाइंडर इ. सामील आहेत. जे अभ्यासाची आठवण देतात व सातत्य टिकवून ठेवतात.
 
संतुलित दृष्टिकाेन स्वीकारा
लक्ष विचलित हाेण्यासाठी व विसरून जाण्यासाठी स्वत:ला दाेष देण्याऐवजी अभ्यास पुन्हा सुरू करणे जास्त उत्तम दृष्टिकाेन आहे.
 
वेळ व दिनचर्या
संशाेधकाच्या मत दीर्घकाळपर्यंत ध्यान करण्याच्या तुलनेत नियमित व वारंवार अभ्यास करणे जास्त प्रभावी असते. हे आपण राेज्या क्रियांशीही जाेडू शकता. अर्थात सकाळी फिरताना वाॅकिंग मेडिटेशन करणे वा दरवेळी जेवणापूर्वी 3 मिनिटांचा अभ्यास करणे.
 
इतरांची मदत
जेव्हा आपण काेणतेही काम इतरांसाेबत मिळून करताे तेव्हा याच्याशी संबंध व सातत्य वाढते.
यामुळे आपुलकी जाणवते.