पुणे, 16 सप्टेंबर (आ.प्र.) :
ओम नमस्ते गणपतये माेरया, माेरया ओम गं गणपतये नमः...च्या जयघाेषाने ॠषीपंचमीनिमित्त आयाेजित साेहळ्यात महिलांच्या गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. 35 हजारांपेक्षा जास्त महिलांनी अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाने उत्सव मंडपासमाेर आयाेजिलेल्या अथर्वशीर्ष पठण साेहळ्यास यंदाही माेठा प्रतिसाद मिळाला.
पुण्याच्या महापाैर मंजूषा नागपुरे, विभागीय आयु्नत शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. परिमंडळ-1 चे पाेलीस उपायु्नत कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी गर्दी केली हाेती. भ्नतीरसात तल्लीन झालेल्या वातावरणातील या कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.