चाणक्यनीती

    17-Sep-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ : अग्निहाेत्राशिवाय वेदांचे अध्ययन; तसेच दान-दक्षिणा दिल्याशिवाय पूजा-पाठादी कर्म व्यर्थ आहेत. कुठलेही कार्य करताना त्यात जर भाव नसेल तर ते कार्य करून न केल्यासारखेच आहे; असे कार्य कधीच सफल हाेत नाही. मनातील भावच खरे महत्त्वाचे.
 
भावार्थ : काेणत्या गाेष्टीत कशाला महत्त्व आहे, हे आर्यचाण्नयांनी येथे सांगितले आहे
 
1. अग्निहाेत्र आणि वेद ः मानववंशाच्या इतिहासात अग्निहाेत्राला विशेष महत्त्व आहे. त्यामागील हेतू अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्वांचा समावेश वेदांमध्ये आहे. जीवनावश्यक पवित्र अग्नी, त्याला सतत धगधगते ठेवण्याचे प्रयास अश्मयुगीन प्रयाेगशाळेतील प्रयाेग, त्यात टाकल्या जाणाऱ्या समिधा या सर्व गाेष्टींचा सविस्तर परिचय वेदांमध्ये येताे.