दप्तर विद्यार्थ्याच्या वजनापेक्षा अधिक जड न ठेवण्याच्या सूचना

    11-Sep-2026
Total Views |
 
schoolbag
मुंबई, 10 सप्टेंबर (आ.प्र.) :
महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या 10 ट्न्नयांपेक्षा अधिक नसावे, असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शालेय शिक्षण आयुक्तांनी 1 सप्टेंबर राेजी जारी केलेले हे निर्देश राज्यातील सर्व शाळांना लागू आहेत. यामध्ये सरकारी, अनुदानित, तसेच खासगी शाळांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना दरराेज आवश्यक तेवढीच पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य आणावे लागेल, अशा पद्धतीने शाळांनी वर्गाचे वेळापत्रक नियाेजित करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 11 ऑगस्ट राेजी जारी केलेल्या शालेय दप्तराचे वजन कमी करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचा आधार या निर्देशांना आहे. केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शाळांनी दप्तराच्या वजनावर नियमित लक्ष ठेवावे, तसेच जड दप्तरामुळे उद्भवणाऱ्या आराेग्यविषयक समस्यांबाबत विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये जनजागृती करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
जड दप्तरांचा प्रश्न पालक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. विशेषतः प्राथमिक व माध्यमिक वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना दरराेज अनेक पाठ्यपुस्तके, वह्या, वर्कबुक्स व इतर शैक्षणिक साहित्य घेऊन जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून राज्याच्या शिक्षण विभागाने आता शाळांना दप्तरासाठी निश्चित वजनमर्यादा पाळण्याचे व विद्यार्थ्यांनी केवळ आवश्यक साहित्यच शाळेत आणावे, यासाठी उपाययाेजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
‘स्कूल बॅग पाॅलिसी 2020’ अंतर्गत शाळांनी नियमितपणे दप्तरांचे वजन तपासणे, तसेच शाळेच्या परिसरातील सुविधा आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. निर्देशांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर सरकारी अनुदानाबाबत दंडात्मक कारवाई हाेऊ शकते. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये शाळेची मान्यताही धाेक्यात येऊ शकते. नॅशनवाइड पॅरेंट्स असाेसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय म्हणाल्या, ‘हे नियम अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. स्कूल बैग