एनआयपीएम आयोजित ३४ वे नवल टाटा स्मृती व्याख्यान

    11-Sep-2026
Total Views |

NIPM 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट(एनआयपीएम) आयाेजित 34 वे नवल टाटा स्मृती व्याख्यान चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर्समध्ये पार पडले.
 
या वर्षीचा व्याख्यानाचा विषय ‘जेन झी युग- कार्यक्षेत्रातील नेतृत्व, संस्कृती आणि धाेरणात्मक मनुष्यबळ व्यवस्थापनाला नवी दिशा’ असा हाेता. या वेळी डाॅ. संताेष भावे यांनी सर्व पिढ्यांनी एकत्र येऊन भविष्यकाळातील कार्यस्थळे घडवावीत, असे सांगितले. तर बदलत्या पिढ्यांबराेबर कार्यस्थळांमधील नेतृत्व आणि मनुष्यबळ व्यवस्थापनातही बदल आवश्यक असल्याचे एनआयपीएम , मुंबईचे अध्यक्ष देवदत्त कल्याणकर यांनी म्हटले.