मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे 'लॉजिस्टिक्स'ला गती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास : ३२६ कि.मी. मार्गिकेच्या ३ टप्प्यांचे लोकार्पण

    10-Sep-2026
Total Views |
 
goods
अलिबाग, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
पश्चिम आणि पूर्व मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबलस्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ हाेणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.
 
यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून 250 पेक्षा अधिक ट्रक इतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी हाेईल. ही बाब देशाच्या लाॅजिस्टिक व्यवस्थेला नवी गती व दिशा देणारी ठरेल’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्य्नत केला.
 
पश्चिम मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किमीच्या आणि 20700 काेटींपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या लाेकार्पणप्रसंगी पंतप्रधान बाेलत हाेते. जेएनपीए येथे आयाेजित कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, रायगडचे पालक मंत्री भरत गाेगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईस्थित जपानी महावाणिज्यदूत साताे हिताेमी, डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार, रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव आदी मान्यवर यावेळी उपस्थित हाेते.
 
या मार्गिकेच्या पूर्णत्वामुळे देशातील संपूर्ण समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क आता पूर्ण झाले आहे. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गावरील प्रवासी रेल्वेंना अधिक वेगाने आणि वेळेत धावण्यास मदत हाेणार असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.
 
जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जाेडणारी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका सुरू झाल्यामुळे राज्याच्या लाॅजिस्टिक्स क्षमतेला चालना मिळणार आहे. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीटीने सुमारे 38.27 लाख टीईयू कंटेनर हाताळले असून, समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या वाहतुकीला आणखी गती मिळेल. 2030 पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्य्नत केला.