संध्यानंद.काॅम
वामन आणि विराट शारीरिक आकाराचे प्रमाण दर्शवणारे हे दाेन्ही शब्द आपल्या संस्कृतीतही महत्त्व ठेवतात. विष्णूच्या पाचव्या वामन अवताराने दैत्यांना राेखण्यासाठी विराट रूप धारण करून तीन पावलांत पृथ्वी, आकाश आणि पाताळ माेजून घेतले आणि देवांची सुरक्षितता अबाधित राहिली. विराट रूपाचे तितकेच माेठे याेगदान. अर्थात, शारीरिक उंची आणि मानसिक उंची यांचा मेळ बसावाच असे नाही.
नुकत्याच घडलेल्या इतिहासावर नजर टाकली तर ओसामा बिन लादेनची शारीरिक उंची बरीच हाेती, पण ताे मानसिकदृष्ट्या वामन (लहान) हाेता. गांधीजींचे शारीरिक आकारमान लहान हाेते, पण त्यांचे कर्तृत्व विराट हाेते.
वामन आणि विराट आकाराच्या मुद्द्यावर जगावर नजर टाकल्यास समजते की ग्वाटेमाला आणि नेपाळमधील लाेकांची शारीरिक उंची खूप कमी असते, तर नेदरलँड्सचे लाेक शारीरिक उंचीच्या बाबतीत जगात अव्वल मानले जातात.
सहा फूट सहा इंच किंवा त्याहून अधिक उंची मानवात विशेष मानली जाते आणि त्यातही नेदरलँड्स बाजी मारताे. अमेरिका आणि चीन या जगातील दाेन माेठ्या महासत्ता शारीरिक उंचीच्या बाबतीत टाॅप पंचवीसमध्येही स्थान राखू शकलेल्या नाहीत. नेदरलँड्सच्या शारीरिक उंचीत झालेल्या असाधारण प्रगतीची कारणे जाणून घेण्यासारखी आहेत. ती तपासल्याने आपल्या आकलनाचा विस्तार हाेताे.