उपवासाला कोणती फळे खावीत ?

    10-Sep-2026
Total Views |

fruits 
उपवासाला सर्व प्रकारची हंगामी आणि ताजी सात्विक फळे खाणे उत्तम मानले जाते. फळे केवळ पाैष्टिकतेनेच भरलेली नसतात, तर फायबर समृद्ध असल्यामुळे ते दीर्घकाळ पाेट भरलेले राहतात. उपवासात सामान्यतः खाल्लेली अशी 5 फळे आहेत, जी केवळ आराेग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही आश्चर्यकारक मानली जातात. चला तर मग जाणून घेऊयात काेणती आहेत ती फळं.
 
केळी : हे फळ प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण भरलेले फळ आहे.
केळी खाल्याने आपल्या शरीराल झटपट ऊर्जा मिळते. त्याच प्रमाणे आराेग्याला अनेक प्रकारे फायदा हाेताे. दुसरीकडे, त्यात असलेल्या व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-सी आणि पाण्याची टक्केवारी त्वचेला पाेषण आणि हायड्रेट ठेवते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी केळी या फळाची निवड नक्की करा.
 
सफरचंद : राेज एक सफरचंद खा आणि डाॅक्टरांना चार हात लांब ठेवा अशा अशयाची एक म्हण प्रचलित आहेच.
सफरचंद आराेग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सफरचंदामुळे त्वचेलाही फायदा हाेताे. हेल्थलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्वचाराेगतज्ज्ञ नाझिया शेख यांनी सफरचंद हे फाेटाेकेमिकल समृद्ध फळ असल्याचे सांगितले हाेते. सफरचंदामध्ये असलेले फ्लेव्हाेनाॅइड्स अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्स, यूव्ही किरण, प्रदूषण आणि त्वचेला हानी पाेहाेचवणाऱ्या इतर अनेक गाेष्टींपासून हाेणाऱ्या वाचवतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी व दरराेज एक सफरचंद नक्की खा.
 
पपई : पपईमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, लाइकाेपीन, प्राेटीओलाइटिक एन्झाईम्स जसे की पॅपेन आणि काइमाेपेन असतात.
याव्यतिरिक्त, त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. यामुळेच हे फळ आराेग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही चांगले मानले जाते.
 
डाळिंब : रक्ताभिसरण सुधारण्यास आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
पेरू आणि संत्री : राेगप्रतिकारशक्ती वाढवणारी आणि ताजेपणा देणारी हंगामी फळे.