राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ हवा पुरस्कारात महाराष्ट्राचा गौरव

राज्यातील अमरावती महापालिका व नाशिकच्या वॉर्ड क्रमांक सात देशात तृतीय स्थानावर

    10-Sep-2026
Total Views |

air 
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
शहरांमधील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययाेजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
 
‘स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026’अंतर्गत राज्यातील अमरावती शहराला तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार, तर नाशिक महापालिकेच्या वाॅर्ड क्रमांक 7 ला वाॅर्डस्तरीय सर्वेक्षणात तृतीय क्रमांक मिळाला. अमरावतीला 25 लाख रुपये, तर नाशिकच्या वाॅर्ड क्रमांक 7ला 30 लाखांचे पारिताेषिक प्रदान करण्यात आले.
 
येथील इंदिरा पर्यावरण भवनातील गंगा सभागृहात आयाेजित राष्ट्रीय स्वच्छ हवा पुरस्कार साेहळ्यात हा गाैरव करण्यात आला. राष्ट्रीय हरित अधिकरणाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयाेगाचे अध्यक्ष राजेश वर्मा, पर्यावरण सचिव तन्मय कुमार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डाॅ. अमनदीप गर्ग यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल 3 ते 10 लाख लाेकसंख्या गटात अमरावती शहराने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. यासाठी शहराला 25 लाखांचे पारिताेषिक देण्यात आले. अमरावतीचे महापाैर श्रीचंद तेजवानी आणि आयु्नत डाॅ. मंगेश गाेंदवले यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. वाॅर्डस्तरीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात 30 हजारांहून अधिक लाेकसंख्या गटात नाशिकमधील वाॅर्ड क्रमांक 7ने राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाॅर्डला 30 लाखांचे पारिताेषिक देण्यात आले. नाशिकच्या महापाैर हिमगाैरी आडके, उपमहापाैर विलास शिंदे, अतिर्नित आयु्नत अमित रंजन, उपायु्नत डाॅ. संगीता नांदूरकर यांच्यासह प्रतिनिधींनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
दहा लाखांपेक्षा अधिक लाेकसंख्या गटात उत्तर प्रदेशातील लखनाैने प्रथम, मध्य प्रदेशातील इंदूरने द्वितीय, तर जबलपूरने तृतीय क्रमांक मिळवला. 3 ते 10 लाख लाेकसंख्या गटात ओडिशातील राऊरकेला प्रथम, तर फिराेजाबाद आणि आंध्रातील गुंटूरने संयु्नतपणे द्वितीय क्रमांक मिळवला. तीन लाखांपेक्षा कमी लाेकसंख्या गटात कलिंगनगर, अंगुल आणि तालचेर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला.