इको-फ्रेंडली गणेशमूर्ती रंगरंगोटी महोत्सव उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा जागर

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगवताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार.

    10-Sep-2026
Total Views |
 
Ganeshotsav
मुंबई, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य खादी व ग्रामाेद्याेग मंडळ आणि उद्याेग विभागाने निसर्गमित्र गणेशाेत्सव व हातकागद कला संवर्धन उपक्रमांतर्गत इकाे-फ्रेंडली गणेशमूर्ती रंगरंगाेटी महाेत्सव आयाेजिला हाेता. या उपक्रमात विविध मान्यवरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं रंगवून पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाचा संदेश दिला.
 
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयाेजित या उपक्रमाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेलार यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे रंगकाम करून उपक्रमात भाग घेतला.
 
यावेळी खादी वस्त्रांचे; तसेच ‘मधुबन’ मधविक्री प्रदर्शनाचेही आयाेजन करण्यात आले हाेते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपक्रमाला भेट देत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर रंगकाम केले. खादी व ग्रामाेद्याेग मंडळाच्या नियंत्रणाखाली पुण्यात हातकागद संस्था कार्यरत आहे. हातकागदाच्या लगद्याचा वापर करून तेथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; तसेच आकाशकंदील तयार केले जातात. पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाबाबत जनजागृतीसाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले आहे.