पमजी, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
महाराष्ट्र 33872 स्टार्ट अप्ससह देशात प्रथम क्रमांकावर असून, देशाची वित्तीय राजधानी मुंबई जागतिक भांडवलाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे, असे गाैरवाेद्गार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी येथे काढले.
पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीत शहा बाेलत हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गाेव्याचे मुख्यमंत्री व परिषदेचे उपाध्यक्ष डाॅ. प्रमाेद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच संबंधित राज्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते.
या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाने 7.8 ट्नके इतका विकास दर नाेंदवला आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा दर साध्य करणे संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे शहा यांनी सांगितले. पश्चिम विभाग हा देशासाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा असून, देशातील सर्वात माेठे आर्थिक, औद्याेगिक आणि वित्तीय केंद्र असल्याचेही त्यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्व नागरी सहकारी बँकांना एफसीएफआरएस प्रणाली केंद्राशी जाेडणे आवश्यक असल्याचे शहा यांनी नमूद केले.
तसेच आगामी काळात किनारपट्टीच्या सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी गृह मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल.महाराष्ट्र स्टार्टअप्स