ठाणे मॅरेथॉनमध्ये प्रवीण कांबळे, रविना गायकवाड प्रथम

एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी होत वाढवला स्पर्धकांचा उत्साह

    01-Sep-2026
Total Views |
 
thane
ठाणे, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असाेसिएशनने आयाेजिलेल्या ठाणे महापाैर वर्षा मॅरेथाॅनमध्ये पुरुष गटात काेल्हापूरच्या प्रवीण कांबळेने अव्वल प्रथम स्थान पटकावले. त्याने 1 तास 7 मिनिटे आणि 21 सेकंदासह 21 किमीचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकच्या रविना गायकवाडने 1 तास 26 मिनिटे आणि 4 सेकंद या वेळेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30 हजार स्पर्धकांनी भाग घेतला.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या, तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्याने एकूण 14 गटांतील स्पर्धांचा प्रारंभ महापालिका मुख्यालयासमाेरील चाैकातून करण्यात आला. 60 वर्षांंवरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धे त महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले हाेते. त्याचबराेबर दिव्यांगांच्या त्रिदल समूहानेही या मॅरेथाॅनमध्ये विशेष भाग घेतला. महापालिका अधिकारी, कर्मचारी व लाेकप्रतिनिधींसाठी एक किमीची काॅर्पाेरेट रन ठेवण्यात आली हाेती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांनी सहभाग घेतला.
 
स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाछी एकनाथ शिंदेही स्पर्धे त काही अंतर धावले. त्यांना धावताना पाहून स्पर्धकांमध्येही चैतन्य निर्माण झाले. शिंदे यांनी बराेबरीच्ंया स्पर्धकांना मागे टाकत आघाडी घेतली. चित्रपटसृष्टीतील मंगेश देसाई, गश्मीर महाजनी, किशाेरी अंबिये, ऐश्वर्या नारकर, अभिज्ञा भावे, हरीश थाेरात, स्वराज नागावकर, शिवानी साेनार, विजया बाबर, निखिल दामले, राेहित परशुराम, ट्विंकल यादव, दक्षता जुईल, अनुज साळुंखे, प्रतीक्षा शिवणकर, तनुष्का विशेल, चेतन गाैरव, समीर परांजपे, अनघा ठाकूर या स्पर्धत सहभागी झाले हाेते. या कलाकारांनीही स्पर्धकांचा उत्साह वाढवत एक किमी स्पर्धेत भाग घेतला. विविध 14 गटांत झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांना 11 लाखांची राेख पारिताेषिके देण्यात आली. 21 किमी स्पर्धेतील विजेत्यास एक लाखाचे पारिताेषिक, सन्माचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.