श्री दासबोध नित्यपाठ

ऐका सद्विद्येची लक्षणे। विचार घेता बळेंचि बाणे। सद्विद्या अंगी ।।१।।

    01-Sep-2026
Total Views |

RamdasSwami 
प्रपंच आणि परमार्थ, ईहलाेक आणि परलाेक या दाेहाेंमध्ये जाे विजयी ठरेल ताेच श्रीसमर्थांच्या दृष्टीने आदर्श पुरुषाेत्तम आहे. त्यांचे आराध्यदैवत असलेला प्रभू रामचंद्र हा असा पुरुषाेत्तम आहे आणि त्याचा आदर्श पुढे ठेऊन सर्व साधकांनी वागावे असा त्यांचा आग्रह आहे.
 
अशा श्रेष्ठ पुरुषाच्या अंगी सद्विद्या वास करीत असते. या सद्विद्येची लक्षणे सांगण्यासाठी श्रीसमर्थांनी दुसऱ्या दशकातील या 8 व्या ‘‘सद्विद्यानिरूपण’’ समासाची याेजना केली आहे. त्याच्या आरंभीच ते म्हणतात की ही लक्षणे शुद्ध, सात्विक व परमसुंदर आहेत. त्यांचा नुसता मनापासून विचार करीत राहिलात तरी ती तुमच्या अंगी यावीत अशी तीव्र इच्छा निर्माण हाेईल आणि हळूहळू त्या दिशेने तुम्ही प्रयत्न सुरू कराल आणि मग स्वत:च सद्विद्यास्वरूप हाेऊन जाल. अशा सुलक्षणांनी युक्त पुरुष कसा असताे ते सांगताना समर्थांच्या कविमनाने त्याच्या अंगी वसत असलेल्या परस्पराविराेधी सद्गुणांचे मनाेहर वर्णन केले आहे.
 
सहसा हे दाेन्ही गुण एकत्र सापडत नाहीत. मात्र सद्विद्याप्राप्त उत्तम पुरुष हा उत्तम असल्याने त्याच्या अंगीच असा गुणसमुच्चय नांदू शकताे.