चाणक्यनीती

    01-Sep-2026
Total Views |

Chankya 
2. मनाची शुद्धता ः शुद्ध मन असणाऱ्या व्य्नती कपट करीत नाहीत. त्या प्रामाणिक आणि धीट असतात. ‘मन शुद्ध तुझं गाेष्ट आहे पृथिवी माेलाची, तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची, पर्वा ही कुणाची’ असे त्याचे वागणे असते. मनातही ते कुणाविषयी वाईट चिंतीत नाहीत.
 
3. इंद्रियांवर नियंत्रण ः डाेळे, नाक, कान, जिव्हा, त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आणि मन अशी अकरा इंद्रिये (हस्तपादादिक पंचकर्मेंद्रिये) असतात. यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण आहे. डायबेटिसमध्ये साधे ‘गाेड खाणे’ (जिव्हेची भूक) बंद झाले की, काय हाेते हे आजकाल सारेच जाणून आहेत.