नागपूर, 31 ऑगस्ट (आ.प्र.) :
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियाेजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाेरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याच्या अपेक्षित वेळापत्रकाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
गाेरेवाड्यात सुरू असलेल्या सर्व कामांसाठी नव्याने स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गाेरेवाडा येथील वन्यजीव संशाेधन व प्रशिक्षण केंद्रातील वसंतराव नाईक प्रशासकीय इमारतीत आयाेजित आढावा बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, खासदार माया इनवाते, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. श्रीनिवास राव, विभागीय आयु्नत विजयलक्ष्मी बिदरी, पाेलीस अधीक्षक हर्ष पाेद्दार, वाइल्डलाइफ रेस्क्यू व ट्रेनिंग सेंटरचे संचालक शिरीष उपाध्ये, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, विभागीय व्यवस्थापक तथा प्राणी संग्रहालय संचालक पांडुरंग पाखले यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. मुख्यमंत्र्यांनी गाेरेवाडा प्रकल्पातील विविध कामांची माहिती घेताना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आफ्रिकन सफारी हा गाेरेवाडा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य कामांची पूर्तता काेणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती त्यांनी घेतली. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता करण्याचे निर्दे श त्यांनी दिले. वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी गाेरेवाडा प्रकल्पाची आतापर्यंतची वाटचाल, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या विविध कामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
मुख्यमंत्र्यांनी या प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी प्रकल्पातील विविध सुविधांची, कामांची माहिती त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली.
प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययाेजनांबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.