ेसेनि हे विश्व येथेंŸ। मीचि विस्तारिलाेंसें निरुतेंŸ।
परि भावाचेनि हातेंŸ। माने जया Ÿ।। 10.103
आपणांपासून हे सर्व विश्व निर्माण झाले आहे याचे भगवंत येथे पुन्हा स्पष्टीकरण करीत आहेत.
कश्यपादि सात ॠषी, चार मनू, स्वर्गादि लाेक इत्यादि सर्व माझ्यामुळेच निर्माण झाले आहे. कश्यपादि अकरा जणांनी इंद्रादि आठ लाेकपाल निर्माण केले. लाेकपाल म्हणजे दिशांचे स्वामी. या लाेकपालांकडून नाना प्रकारचे लाेक निर्माण झाले. त्यांचे स्वामी ठरविले गेले. ही सर्व माझीच प्रजा आहे, हा माझाच विस्तार आहे हे ध्यानात ठेव.
अर्जुना, प्रथम एकटे बीच असते, मग त्याला अंकुर ुटल्यावर बुंधा निर्माण हाेताे. या बुंध्यापासून नाना ांद्या, पाने, ुले यांची निर्मिती हाेते. पालवीपासून ूल व ुलापासून फळ उत्पन्न हाेते. पण या सर्व विस्ताराचा विचार केला असता ध्यानात येते की, हे सर्व झाड म्हणजेच एक बी आहे. याचप्रमाणे प्रथम मी एकटाच असताे.
माझ्यापासून मन निर्माण हाेते. मनापासून कश्यपादि सात ॠषी उत्पन्न हाेतात. स्वयंभू आदि मनू तयार हाेतात. मनू, इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैॠर्ती, वायू, कुबेर व ईशान असे आठ लाेकपाल निर्माण करतात.
या लाेकपालांनी स्वर्गादि लाेकांची रचना केली व या लाेकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे प्रत्यक्ष दिसणारे हे सर्व विश्व माझ्यापासूनच निर्माण झाले नाही काय? खरे पाहता हा माझाच विकार म्हणजे विस्तार आहे.
पण या विषयाकडे जाे नीट पाहील, त्यालाच हे ध्यानात येईल.
असा हा माझा विस्तार एका बीजापासून सर्व विश्वापर्यंत झालेला आहे आणि बुध्यादि विकार या सर्व माझ्याच विभूती असून त्यांच्या याेगाने सर्व जग व्यापून गेले आहे.