पूर्वी ब्रेन ट्यूमर एक घातक आजार मानला जात असे, पण अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे याचे उपचार फक्त साेपेच बनवलेले नाहीत, तर ते यशस्वी हाेण्याची टक्केवारीही वाढली आहे. ट्यूमर काेणत्या प्रकारचा आहे, हा मेेंदूच्या काेणत्या भागात आहे आणि उपचारात हा कसा रिस्पाॅन्स देत आहे यावर उपचार अवलंबून असता.
जर ट्यूमर जिथे ऑपरेशनद्वारे पाेहाेचणे श्नय आहे अशा जागी असेल तर ताे सर्जरीद्वारे काढून टाकला जाताे. मायक्राे एंडाेस्काेपिक सर्जरीने (एमईएस) ब्रेन ट्यूमरासाठी केली जाणारी सर्जरी साेपी व सुधारित केली आहे. एमईएसद्वारे एकतर पूर्ण ट्यूमर काढला जाताे व पूर्ण ट्यूमर काढता येणे श्नय नसेल तर त्याचा जास्तीत जास्त भाग काढून टाकला जाताे. यामुळे लक्षणे कमी करण्यास मदत हाेते.
याशिवाय बे्रन ट्यूमरच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी, किमाेथेरपी, टार्गेट ड्रग थेरपी आणि रेडिओ सर्जरीचा वापरही केला जाताे. रेडिओ सर्जरी ब्रेन ट्यूमरचा अत्याधुनिक उपचार आहे. हा एकाच सीटिंगमध्ये हाेताे आणि बहुतेक केसेसमध्ये रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकताे.
यामध्ये कॅन्सरग्रस्त पेशी मारण्यासाठी रेडिएशनच्या अनेक बीम्सचा वापर केला जाताे. जाे एका बिंदूवर (ट्यूमर) फाेकस हाेत असताे. ही रेडिएशन थेरपीपेक्षा खूप उत्तम मानली जाते. याच्या यशाचा दर 80- 90 टक्के आहे आणि साइड इफे्नटही अत्यंत कमी असतात.
उपचारानंतरही जर दैनंदिन कामांमध्ये वा बाेलण्यात समस्या हाेत असेल तर फिजिकल थेरपी, स्पीच थेरपी व ऑ्नयुपेशनल थेरपीची मदत घेतली जाते.
जर ब्रेन ट्यूमर मेंदूच्या बाेलण्याची, विचार करण्याची व पाहण्याच्या क्षमता नियंत्रित करणाऱ्य भागातही विकसित असेल तर कित्येकदा उपचारानंतरही या क्रिया सामान्य हाेऊ शकत नाहीत. रुग्णाला गरजेच्या आधारे डाॅ्नटर स्पीच थेरपीचा सल्ला देऊ शकतात. यासाठी स्पीच पॅथालाॅजिस्ट मदत करतात. माेटर स्किल वा स्नायूंची ताकद पुन्हा मिळवण्यासाठी फिजिकल थेरपीचे सेशन दिले जातात. ऑ्नयुपेशनल थेरपीने दैनिक हालचाली करण्यास मदत केली जाते.