त्याचेच कर्तरी स्वरूप ‘‘अपहारकर्ता’’ हे श्रीसमर्थांनी साडेतीनशे वर्षापूर्वी वापरलेले पाहून आनंदाश्चर्य वाटते.
दुर्वर्तनी माणसाची लक्षणे सांगताना ते पुढे म्हणतात की ताे स्वैर, माेकाट, नकाे तेथे धीटपणा करणारा म्हणजेच वडील मंडळींचा मान न राखणारा आणि लाेकलज्जेची पर्वा न करणारा, चहाटळ, चावट, स्वत:चाच गाजावाजा करून बडबडणारा, कुभांड रचणारा, ढाेंग करणारा, स्त्रीलंपट आणि कुबुद्धीचा असताे.
याहूनही दुर्जनतेची वरची पायरी गाठणारे मारेकरी, दराेडेखाेर, लुटालूट करणारे, वेळप्रसंगी घरे खणून धन लुटणारे, आळशी, भाेंदू, परद्वार करणारे आणि चेटूक करणारेही असतात. ही कुविद्येची लक्षणे ऐकताना सहजच असा विचार मनात येताे की, श्रीसमर्थांचे निरीक्षण किती अचूक व बारकाईचे आहे. अगदी एखाद्या राष्ट्रपती पदक विजेत्या पाेलीस अधिकाऱ्याने जरी गुन्हेगारांचा अभ्यास करून दुर्गुणांची यादी करावयाची म्हटली तरी त्यालाही इत्नया सूक्ष्मतेने ती करता येणार नाही. एका तऱ्हेने या संपूर्ण समासात श्रीसमर्थांची भूमिकाच मुळी टाकून देण्यासाठी काेणकाेणते दाेष असू शकतात, असे दाेष दिग्दर्शनाचे आहे, हे आपण जाणत्यांनी ओळखले पाहिजे व ते टाळण्याच्या मार्गाला लागले पाहिजे. हाच त्यांचा उपदेश आहे! -
प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299