झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने करा : मिसाळ

    07-Aug-2026
Total Views |
 
rehabilitation
मुंबई, 6 ऑगस्ट (आ.प्र.) :
पुणे व मुंबईतील झाेपडपट्टी पुनर्वसन याेजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करावी यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर झाेपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाप्रीतच्या माध्यमातून या याेजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
 
या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, पुणे झाेपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव चंद्रशेखर तरंगे; तसेच संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.
बैठकीत पुणे व मुंबईतील झाेपडपट्टी पुनर्वसन याेजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
 
याेजनांच्या प्रभावी नियाेजनासाठी सल्लागार संस्था निश्चित करून पुढील कार्यवाही करणे, सुरू असलेल्या याेजनांचे सर्वे क्षण, क्षेत्रनिहाय तपशिलांचे परीक्षण; तसेच विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. झाेपडपट्टी पुनर्वसन याेजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, म्हाडा तसेच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मिसाळ यांनी दिल्या.
 
आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा आणि विकासकामे वेळेत पूर्ण हाेण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्दे शही मिसाळ यांनी दिले.