ताे मी वैकुंठीं नसेंŸ। वेळ एक भानुबिंबींही न दिसेŸ।।
वरी याेगीयांचींही मानसेंŸ। उमरडाेनि जायŸ।। 9.207
आपण निराकार, निर्गुण आहाेत अशी ग्वाही देणाऱ्या भगवंतांना येथे भक्ताच्या अधीन व्हावे लागले आहे.
ज्ञानेश्वरांच्या पंथातील लाेकांना देव शाेधावा लागत नाही. देवच त्यांचा शाेध घेत असताे.
पुंडलिक काही परब्रह्माच्या शाेधास गेला नव्हता.
त्याच्या भेटीसच परब्रह्म चंद्रभागेच्या तीरावर आले व पुंडलिकाच्या आज्ञेमुळे कटीवर कर ठेवून अखंडपणे उभे राहिले.
अशा रीतीने सर्व जगच वैकुंठरूप करणाऱ्या भक्तांचा व त्यांनी केलेल्या नामसंकीर्तनाचा महिमा भगवंत येथे सांगत आहेत. असे हे भक्त कसे असतात? ते सूर्यासारखे तेजस्वी असतात.
पण त्याचा मावळणे हा दाेष तेथे नसताे. ते चंद्रासारखे असतात; पण त्याच्यासारखे ते कधी क्षीण हाेत नाहीत. सत्पुरुष अखंड परिपूर्ण असतात. मेघ उदार असतात. पण वृष्टी केल्यावर ते ओसरतात; म्हणून या संतांना काेणतीच उपमा देता येत नाही. ते निर्धास्त व कृपाळू सिंहासारखे असतात.यांचे वर्णन करताना भगवंतांनी सांगितले आहे की, माझे नाव एकदा जरी मुखात आले तरी हजाराे जन्मांचे श्रेय भक्ताच्या पदरी पडते.
त्याच्या मुखात आनंदाने व सुखाने माझेच नाव असते. पुढे भगवंत असे सांगतात की, न दिसणारा मी कुठे शाेधावा ? तर अर्जुना, ध्यानात ठेव की, एखाद्या वेळेस मी वैकुंठात नसेन, सूर्यबिंबाच्या ठिकाणीही मी दिसणार नाही.
याेगी लाेकांची मनेही मी ओलांडून जाईन.
मग मला काेठे शाेधावे ? तर अर्जुना, ज्या ठिकाणी माझा नामघाेष माेठ्या प्रेमाने चाललेला असताे, त्या ठिकाणी मी हरवलेला सापडताे.
इतरत्र काेठेही माझा शाेध घेता येणार नाही.