मुंबई, 6 ऑगस्ट (आ.प्र.) :
मुख्यमंत्री साैर कृषी याेजना 2.0 आणि मागेल त्याला साैर कृषी पंप या याेजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राने साैरऊर्जे च्या आधारावर कृषी सिंचनात लक्षणीय यश मिळवले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाेबतच राेजगारनिर्मितीला मदत हाेत आहे. साैरऊर्जा वापराचे राज्याचे हे माॅडेल अन्य राज्यांसाेबतच जागतिक पातळीवरील विकसनशील देशांसाठी उपयुक्त ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र यांनी केले.
महावितरण, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) आणि ‘मित्रा’ने कृषी सिंचनासाठी साैरऊर्जे चा वापर या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन करताना लाेकेश चंद्र बाेलत हाेते.
या वेळी ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी सल्लागार सुधीरकुमार गाेयल, महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार, एआयआयबीचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी प्रत्युष मिश्रा यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.
राज्यात आतापर्यंत 11 लाख साैर कृषी पंप आस्थापित करण्यात आले असून, त्यामुळे 11 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच, 40 लाख एकर शेतीत सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री साैर कृषी वाहिनी याेजना 2.0 अंतर्गत आतापर्यंत सहा हजार मेगावाॅट क्षमतेचे साैरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. ब्राझीलमध्ये जागतिक हवामान परिषदेत महाराष्ट्राचे हे माॅडेल मांडल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
विकसनशील देशांमध्ये या माॅडेलचा वापर करण्याबाबत महावितरणचा इंटरनॅशनल साेलर अलायन्ससाेबत सामंजस्य करार झाला आहे. एआयआयबीच्या माध्यमातून इतर विकसिनशील राष्ट्रांमध्ये महाराष्ट्र माॅडेल राबवता येईल, असे लाेकश चंद्र यांनी सांगितले. परदेशी, श्रीराम वेदिरे यांनीही मनाेगत व्यक्त केले.