एक काळ असा हाेता की मायग्रेन, पाेटात कळा येणे, मुका मार लागणे किंवा पडल्याने शरीराला आलेली सूज, पाय मुरगळणे, भाजणे, अपचन, उन्हाळी लागणे, सर्दी-खाेकला यांसारख्या अनेक लहान-माेठ्या दैनंदिन शारीरिक तक्रारी, आजारांसाठी लाेक वैद्याकडे किंवा डाॅक्टरांकडे धाव घेत नसत.
अशा सर्व आजारांवर उपचार आजीआजाेबां सारखी वडीलधारी मंडळी पिढ्यानपिढ्या मिळालेल्या उपजत ज्ञानाने करत असत. या ज्ञानामध्ये अनुभव तसेच स्वयंपाकात वापरले जाणारे मसाले, जंगली वनस्पती, जडीबुटी, भाज्या तसेच घराशेजारी उगवणारी तुळस, डमराे (एक वनस्पती), काेरफड यांसारख्या वनस्पतींच्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांची माहिती वारशाने मिळत असे.
वास्तविक पाहता, सर्वसामान्य आजार बरे करण्यासाठी वनस्पतींची पाने, मसाले आणि आजीचे वैद्यक पुरेसे ठरतात अशा प्रकारचे घरगुती उपचार केले जात, असा ताे एक जमाना हाेता.
अर्थात, काळ आणि त्यासाेबत जीवनशैली बदलल्याने घरगुती उपचारांचे चलन कमी झाले आहे. तरीही अनेक कुटुंब ही परंपरा विसरलेली नाहीत.
खानपानवरील नियंत्रणासह घरगुती उपचार असाध्य आजारांमध्येही आराम देत असल्याचे आढळून आले आहे.
यामध्ये मधुमेह, वाढलेले काेलेस्ट्राॅल इत्यादींचा समावेश हाेताे.
काेलेस्ट्राॅल म्हणजे काय? :
काेलेस्ट्राॅल म्हणजे लिव्हरद्वारे तयार हाेणारे एक महत्त्वाचे लिपिड. चरबीसाठीच्या ग्रीक शब्द ङळिेी वरून लिपिड हा शब्द उतरला आहे. काेलेस्ट्राॅल शरीराचे कार्य तसेच संप्रेरके (हाॅर्माेन्स) तयार हाेण्यात महत्त्वाची भूमिका बजावताे.
काेलेस्ट्राॅलचे प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्राेक यांसारखे हृदयाचे गंभीर आजार हाेण्याचा धाेका वाढताे. अपाेषक आहार, व्यायामाचा अभाव तसेच चरबीयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने काेलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढू शकते. आश्चर्याची गाेष्ट म्हणजे त्याचे प्रमाण वाढत असल्याचे काेणतेही लक्षण नजरेस पडत नाही.
परिणामी आराेग्य बिघडण्याचा दीर्घकालीन धाेका निर्माण हाेताे.
काेलेस्ट्राॅलचे प्रमाण आवश्यक तेवढे राहावे यासाठी वैद्यकीय सल्ला (मेडिकल कन्सल्टेशन) आणि प्रिस्क्राइब केलेले औषधाेपचार अनिवार्य आहेत.
साेबतच काेलेस्ट्राॅलचे याेग्य प्रमाण राखणारे नैसर्गिक उपचार आयुर्वेदामध्ये देखील आहेत. ज्यामध्ये घरगुती खाद्य पदार्थांचा वापर केला जाताे. असे उपचार खालीलप्रमाणे आहेत.
मेथीचे दाणे :
स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या दाण्यांपासून क्वचितच काेणी अज्ञानात असेल. मेथीच्या औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदामध्ये याचे वेगळे महत्त्व आहे.