साताऱ्यात सार्वजनिक गणेश आगमन सोहळ्यात डीजेवर बंदीचा पोलिसांचा निर्णय

    06-Aug-2026
Total Views |
 
ganeshutsav
सातारा, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांच्या आगमन साेहळ्यात डीजेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांनी डीजेमु्नत उत्सव साजरा करताना शांतता व नियमांचे पालन करावे, अशा सूचना पाेलीस प्रशासनाने दिल्या आहेत तसेच मंडळांनी केलेल्या मागणीनुसार आगमन साेहळ्याच्या मिरवणुकांसाठी पाच दिवसांची मुभा देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली.
 
साताऱ्यातील पाेलीस करमणूक केंद्रात गणेश मंडळे आणि पाेलीस प्रशासनाची बैठक झाली. उपविभागीय पाेलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पाेलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक निरीक्षक राजेश माने आदींसह मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित हाेते. येत्या काही दिवसांत गणेशाेत्सव समिती आणि मंडळांची संयु्नत बैठक हाेणार आहे. या बैठकीत गणेश आगमन मिरवणुकीसाठी तारखा निश्चित करून त्या पाेलीस प्रशासनाकडे पाठवल्या जाणार आहेत. त्याच तारखांना शहरातील मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.