बाहेर खाण्यापेक्षा खाणे घरी मागवण्याची क्रेझ वाढत आहे

    06-Aug-2026
Total Views |
 
CloudKitchen
मुंबई, 5 ऑगस्ट (आ.प्र.) :
भारतात आता बाहेर खाण्यापेक्षा घरीच मागवून खाण्याचे वेड वाढत आहे. रेदशीर स्ट्रॅटेजी कन्सल्टन्टच्या ताज्या अहवालानुसार देशातला अन्न बाजार आता 8.5 लाख काेटी रुपयांचा झाला आहे.
ताे 2030 पर्यंत वाढून 14.30 लाख काेटी रुपये हाेईल. या इतक्या माेठ्या उलाढालीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे या उलाढालीसाठी आता आलिशान रेस्टाॅरंट सुरू करण्याची गरज राहिलेली नाही. थेट अन्न खरेदीपेक्षा ऑनलाइन बाजाराची वाढण्याची गती अडीच पॅट जास्त आहे.
 
क्लाऊड किचन माॅडेल (म्हणजे तेथे बसून खाण्याची व्यवस्था नसते, तेथून केवळ ऑनलाइन ऑर्डर्स घेऊन पूर्ण केल्या जातात) सध्या फूड उद्याेगातील गेम चेंजर ठरला आहे. सगळ्यांत जास्त नफा सध्या याच प्रारूपात हाेत आहे. त्यामुळे उद्याेजक या व्यवसायाकडे वळत आहेत.
 
फूड डिलिव्हरी : लहान शहरांत व्यवसाय 3 पट वाढला या एकूण बाजारात ऑनलाइन डिलिव्हरीचा हिस्सा आर्थिक वर्ष 2021च्या 4% वरून वाढून आता 2026 मध्ये 11% झाला आहे. 2031 पर्यंत ताे 18% हाेईल, असा अंदाज आहे. नवे क्लाऊड किचन ब्रॅण्ड्स ऑनलाइन चॅनलवर 90% महसूल कमावतात. रेस्तराँतच हाच हिस्सा केवळ 50% आहे. लहान शहरांतसुद्धा हा ट्रेंड पाेचला आहे. 2021-26 या काळात मेट्राे शहरांतील ऑर्डर्स 30 काेटींवरून वाढून 106 काेटींपर्यंत पाेचल्या. तर लहान शहरांत त्या 6 काेटीवरून तीन पट वाढून 18 काेटींवर पाेचल्या.
 
कमी भांडवलात व्यवसाय : जागेत पैसे जात नाहीत महागड्या ठिकाणी शाेरूम भाड्याने अथवा खरेदी घेऊन तेथे व्यवसाय सुरू करण्याची गरज नाही.
 
गल्लीबाेळात, आडबाजूला काेठेही हा व्यवसाय सुरू करता येताे. ती जागा आणखी काेणाच्या भागीदारीत असली तरी चालते. कारण तेथे थेट व्यवसाय हाेत नाही.
 
ठरावीक मेन्यू मेन्यूमध्ये पन्नास पदार्थ ठेवण्यापेक्षा काही ठरावीक पदार्थच ठेवले तर किचनमध्ये कच्चा माल वाया जाण्याचे प्रमाण कमी हाेते. आणि एकाच प्रकारचे काम करायचे असल्याने कामाचा वेगही वाढताे.
प्रीमियम पाेझिशनिंग आराेग्यपूर्ण किंवा प्रीमियम श्रेणीत स्वतःला बसवणे. यामुळे प्रसंगी जास्त किंमत द्यायलासुद्धा ग्राहक तयार असताे.