चाणक्यनीती

    06-Aug-2026
Total Views |

Chankya
वाच्यार्थ : राजाचे बळ बाहूमध्ये म्हणजे भुजांमध्ये, ब्राह्मणाचे बळ त्याच्या ब्रह्मविद्येत आणि स्त्रियांचे बळ त्यांचे रूप, तारुण्य आणि माधुर्यात असते.
 
भावार्थ : प्रत्येकाची बलस्थाने वेगवेगळी असतात.
 
1. राजाः राजा निराेगी, पराक्रमी असेल तर ताे चांगली सेना उभी करू शकताे. राजाचे बळ त्याचे बाहुबळ, त्यांचे क्षात्रतेज! राजाला सर्व प्रकारची शास्त्रविद्या शिकावी लागते. शस्त्रे चालविण्यासाठी सश्नत हातांची तसेच ते शस्त्र नेमकेपणाने चालविण्यासाठी तल्लख, एकाग्र बुद्धीचीदेखील गरज असते. यासंदर्भात ‘रामबाण’ किंवा रामाने पेललेले ‘शिवधनुष्य’ किंवा अर्जुनाने त्याचे धनुष्य पेलून द्राैपदी स्वयंवराच्या वेळी फिरत्या माशाचे प्रतिबिंब पाण्यात पाहून त्याचा भेदलेला डाेळा आपण आठवू शकताे.