वसई-विरारमधील गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा

    31-Aug-2026
Total Views |

 ganpati
वसई, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
वसई-विरारमधील गणेशाेत्सव सुरक्षित, शांततेत आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडावा यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. आगामी उत्सवादरम्यान काेणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने मंडळांना केले आहे; तसेच उत्सवाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
 
गणेशाेत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयाेजित विशेष बैठकीस महापाैर अजीव पाटील, उपमहापाैर मार्शल लाेपीस, आयु्नत पृथ्वीराज बी. पी., विराेधी पक्षनेते मनाेज पाटील आणि पाेलीस उपायु्नत अशाेक वीरकर व शशिकांत बाेराटे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
 
या बैठकीत मंडळांच्या प्रतिनिधींनी शहरातील खड्डेमय रस्ते, विसर्जन स्थळांवरील अपुऱ्या सुविधा, तात्पुरत्या वीजजाेडणीतील अडचणी आणि मिरवणूक मार्गावरील वाहतूक काेंडीसारख्या समस्या मांडल्या.
त्यावर उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची 100 ट्नके दुरुस्ती करण्याचे आश्वासन आयु्नतांनी दिले.
 
मंडळांची धावपळ थांबवण्यासाठी पाेलीस, वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या परवानग्या एकाच छताखाली देणारी सिंगल विंडाे सिस्टीम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मंडळांनी वेळेत सर्व परवानग्या घ्याव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले.
गणेशाेत्सवा दरम्यान मंडळांनी विनापरवानगी किंवा खासगी जाहिरातींचे हाेर्डिंग्ज लावू नयेत, असा स्नत इशारा महापालिकेने दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
 
जाहिरातींसाठी महापालिकेकडे ऑनलाइन अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले आहे.
मंडळांनी ध्वनी मर्यादा पाळावी, ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाेलिसांनी दिला आहे.