नवी मुंबई विमानतळावर प्रथमच उतरले सर्वांत मोठे बोइंग-७४७ मालवाह विमान

    31-Aug-2026
Total Views |
 
Boeing747-400F
नवी मुंबई, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर माेठ्या आकाराच्या मालवाहू विमानांची वर्दळ वाढत असतानाच नॅशनल एअरलाइन्सचे बाेइंग 747-400 एफ हे सर्वांत माेठे मालवाहू विमान नुकतेच दाखल झाले. जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावरून माल घेऊन आलेल्या या विमानाचे विमानतळावर जलताेफांच्या सलामीत स्वागत करण्यात आले. नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले हे आतापर्यंतचे सर्वांत माेठे विमान ठरले आहे. नॅशनल एअरलाइन्सचे बाेइंग-747-400 एफ हे चार इंजिनांचे मालवाहू विमान आहे.
 
माेठ्या आकाराचा आणि वजनदार माल वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जाताे. फ्रँकफर्ट ते नवी मुंबई या थेट हवाई मार्गावरून हे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरले. नवी मुंबई विमानतळावर यापूर्वी इंडिगाे कार्गाेचे एअरबस ए 321, हाँगकाँग एअर कार्गाेचे एअरबस ए 330-200 एफ आणि अफकाॅम कार्गाेचे बाेइंग-737-800 एफ ही मालवाहू विमाने दाखल झाली आहेत.