नाशिक, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता विविध कामे वेगात सुरू आहेत. सर्व संबंधित यंत्रणा ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीचा सर्वांत माेठा आविष्कार असलेल्या या महासाेहळ्याची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ठक्कर डाेम येथे सिंहस्थ महाकुंभ भ्नती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी नाशिकचे पालक मंत्री गिरीश महाजन, पणन मंत्री जयकुमार रावल, उद्याेग मंत्री उदय सामंत, शालेश शिक्षण मंत्री दादा भुसे, महापाैर हिमगाैरी आडके-आहेर, खासदार शाेभा बच्छाव, राजाभाऊ वाजे उपस्थित हाेते. साधुग्रामची जागा अडीच हजार काेटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जागेचा उपयाेग भविष्यातही कुंभमेळ्यासाठीच व्हावा, यासाठी त्यांची याेग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते, पायाभूत सुविधा; तसेच भाविकांसाठी आवश्यक विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. यावेळी सिंहस्थ सहायक समितीची पुस्तिका, संकेतस्थळ आणि अॅपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
साधुग्रामच्या जागांबाबत काही नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्यास त्या दूर करण्यात येतील. तसेच संबंधितांना याेग्य माेबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासन आणि प्रशासनासाेबत नाशिककरांनीही एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले. कुंभमेळ्याच्या नियाेजनासाठी माेठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची आवश्यकता भासणार असल्याने प्राधिकरणामार्फत ‘कुंभ दूत’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. विभागीय आयु्नत डाॅ. गेडाम यांनी प्रास्ताविक केले.