मुंबई, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
वाढती लाेकसंख्या, झपाट्याने हाेणारे शहरीकरण व औद्याेगिकीकरण, बदलते हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंपत्तीचे समन्यायी, पारदर्शक, कार्यक्षम आणि शाश्वत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
राज्याच्या जलव्यवस्थापनात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका, पाणी हक्कदारी, जलप्रशुल्क, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग; तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्वेताली ठाकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र आणि दिलखुलास या कार्यक्रमांतून सविस्तर मार्गदर्शन केले आहे. जय महाराष्ट्रमध्ये या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवारी (1 सप्टेंबर), तर दुसरा भाग 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित हाेईल. याचबराेबर महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.