आपल्या शरीराचे आराेग्य टिकवून ठेवण्यासाठी मजबूत राेगप्रतिकारश्नती (इम्युनिटी) अत्यंत महत्त्वाची असते. राेगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर शरीर विविध विषाणू, जीवाणू आणि इतर संसर्गजन्य आजारांशी प्रभावीपणे लढू शकते.
(भाग-1) राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काेणताही एक चमत्कारी उपाय नसून, संतुलित आणि पाैष्टिक आहार हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. विशेषतः झिंकसारखी आवश्यक खनिजे शरीराच्या संरक्षण यंत्रणेला सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
संतुलित आहार म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व पाेषक घटक याेग्य प्रमाणात मिळतील असा आहार. यामध्ये कार्बाेहायड्रेट्स, प्रथिने, आराेग्यदायी चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा. दरराेज विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच सुका मेवा यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
झिंकचे महत्त्व ः झिंक हे शरीरासाठी अत्यावश्यक खनिज आहे.