सावंतवाडी, 30 ऑगस्ट (आ.प्र.) :
गाेवा मु्नितसंग्रामात प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक व्य्नतीचा इतिहासात याेग्य सन्मान झाला पाहिजे. गाेवामु्नतीसाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांची सखाेल माहिती संकलित करून त्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमाेद सावंत यांना केले.
गाेव्यातील पत्रादेवीत पुनर्रचित हुतात्मा स्मृती स्मारकाचे लाेकार्पण राजनाथ सिंह यांच्या हस्ते माेठ्या उत्साहात पार पडले. या साेहळ्यात त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली; तसेच स्मारक परिसरात वृक्षाराेपण केले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, गाेवा-दमण-दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष राेहिदास देसाई यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक उपस्थित हाेते. राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘मार्टर्स ऑफ गाेवा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
गाेव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि हुतात्म्यांचे शाैर्य नव्या पिढीपर्यंत पाेहाेचवण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्य्नत केला. स्वातंत्र्यासाठी र्नत सांडलेल्या एकाही वीराचे नाव इतिहासातून वगळले जाऊ नये; सर्व हुतात्म्यांची नावे दगडावर काेरून त्यांचे कायमस्वरूपी स्मरण केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्य्नत केली. गाेव्याच्या मु्नितसंग्रामाचा इतिहास केवळ 1946 पासूनचा नसून, त्यापूर्वी अनेक दशकांपासून पाेर्तुगीज राजवटीविराेधात संघर्ष सुरू असल्याचे डाॅ. सावंत यांनी स्पष्ट केले. यात कुंकळ्ळीचा ऐतिहासिक उठाव हा प्रतिकाराचा एक मुख्य अध्याय हाेता, असे त्यांनी अधाेरेखित केले.