संध्यानंद.काॅम
गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्र्समध्ये सर्वाधिक विक्रम नावावर असलेल्या अमेरिकन डेव्हिड रश याने स्वतःच्या नावावर आणखी एक विक्रम नाेंदवला आहे. त्याने 125 टी-शर्ट घालून 42.2 कि.मी.
ची मॅरेथाॅन पूर्ण केली. यासाेबतच, त्याने ‘मॅरेथाॅन दरम्यान सर्वाधिक टी-शर्ट घालण्याचा’ नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव नाेंदवण्यासाठी डेव्हिड सुमारे सहा तास धावला.
125 टी-शर्टमुळे त्याच्या शरीरावर 19.5 किलाेचा अतिरिक्त भार पडला हाेता. या सर्व टी-शर्टमुळे शरीरातील उष्णता बाहेर पडू शकली नाही आणि त्याचे शरीर खूप गरम झाले. एका क्षणी परिस्थिती इतकी गंभीर झाली की, त्याच्या अंगावर टाकलेला बर्फही फुटला. गेल्या वर्षी त्याने 137 टी-शर्ट घालून हाफ मॅरेथाॅनचा विक्रम प्रस्थापित केला हाेता. या विक्रमानंतर त्याला खात्री वाटली की ताे आता पूर्ण मॅरेथाॅनदेखील धावू शकताे.