श्री दासबोध नित्यपाठ

निष्ठरपण धरु नये। जिणें शाश्वत मानू नये । २।।

    03-Aug-2026
Total Views |
 

RamdasSwami
परमेश्वरभक्ती आणि कथाकीर्तन चुकवू नये आणि प्रपंचाच्या प्रेमामुळे परमार्थमार्ग विसरू नये.
काेणत्याही क्षेत्रात ज्ञान मिळविण्यासाठी गुरू करणे आणि जाणत्याची संगत धरणे जरूर आहे.
 
एखाद्या कार्याला हात घालण्यापूर्वी आपला वकूब लक्षात घ्यावा आणि पावसात किंवा अवेळी प्रवास टाळावा अशा राेजच्या व्यवहारातील मार्गदर्शनाबराेबरच सत्याचा पक्ष कधीही साेडू नये आणि असत्य मार्गाने जाऊ नये. एवढेच नव्हे तर आपले जगणे अमरत्वाचे नाही हे लक्षात ठेवून चांगुलपणानेच वागावे हेही ते बजावतात. याच समासात त्यांनी हीन जातीचा गुरू करू नये असे सांगितले आहे. त्याचाही अर्थ हीन वृत्ती असणारा आणि अनाचाराने वागणारा गुरू करू नये असाच साक्षेपाने घेतला पाहिजे. सभेतील गर्दी पाहून बाेलण्यास गांगरून जाऊ नये आणि काेणी टीका केली तर विचलित न हाेता त्याला परखडपणे प्रत्युत्तर तत्क्षणीच दिले पाहिजे.
 
एवढी सर्व उत्तम लक्षणे सांगितल्यानंतर त्या समासाचा शेवट करताना ते त्याचा मथितार्थ थाेड्नयात सांगतात की, ज्यायाेगे दाेष व अपकीर्ती जाईल आणि सद्कीर्ती वाढेल असा सत्यमार्ग विवेक आणि विचार यांची कास धरून स्वीकारावा, असे वागण्यातच स्वत:चा, समाजाचा व देशाचा उद्धार आहे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299