नाशिक, 2 ऑगस्ट (आ.प्र.) :
नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे ध्नके जाणवत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या भागातील धरणे, तलाव, माेठे पूल, शासकीय इमारती आदींची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. भूकंपाच्या ध्न्नयांमुळे धरणांच्या भिंती किंवा पुलांना तडे गेले आहेत का, पाण्याची गळती वाढली आहे का अथवा अन्य काेणतीही संरचनात्मक हानी झाली आहे का, याची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे.
सुरगाणा, दिंडाेरी, पेठ व कळवण तालुक्यांतील काही भागांत चार दिवसांत 2 ते 3.9 रिश्टर स्केलचे ध्नके जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी संशाेधन संस्थेच्या (मेरी) भूकंपमापन केंद्रात त्याची नाेंद झाली आहे. कळवण तालुक्यातील दळवट परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जाताे. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागांत पावसाळ्यात भूगर्भात काही हालचाली जाणवत असल्याचे सांगितले जाते.
भूकंपाच्या ध्न्नयांमुळे जिल्ह्यात काेणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भविष्यातील संभाव्य धाेका टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. भूकंपाच्या ध्न्नयांमुळे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील धरणे, कालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महत्त्वाचे पूल, रस्ते व शासकीय इमारती तसेच इतर विभागांच्या अखत्यारितील संबंधित मालमत्तांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययाेजना करणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
भूकंपाचे ध्नके जाणवलेल्या सुरगाणा, दिंडाेरी, पेठ, कळवण व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यांतील सर्व धरणे, तलाव, माेठे पूल, शासकीय विश्रामगृहे, वसतिगृहे, समाजमंदिरे, शासकीय इमारती आणि शाळांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपासणीअंती संभाव्य धाेका आढळल्यास तातडीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक व दुरुस्तीची कार्यवाही हाती घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.