नागपूर, 2 ऑगस्ट (आ.प्र.) :
जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षांत नागपूर शहर जलदगतीने विकसित हाेत असून, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराचा चेहरा बदलत आहे.
एक वैश्विक शहर नवी ओळख निर्माण हाेत असल्यामुळे शहराच्या सुनियाेजित विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महापालिकेत आयाेजित विशेष समारंभात शहरातील 476 सफाई कामगारांना कायम नियु्नतीपत्र; तसेच सरळसेवा भरतीने 103 युवकांना नियु्नतीपत्रांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित हाेते.
पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापाैर नीता ठाकरे, आमदार माेहन मते, कृष्णा खाेपडे, उपमहापाैर लीला हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयाेगाचे अध्यक्ष शेरसिंह डागाेर, स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, महापालिका आयु्नत डॅा. विपीन इटनकर, अतिर्नित आयु्नत मुरगनाथन एम. आदी अधिकारी; तसेच विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित हाेते.
नवनियु्नत कर्मचाऱ्यांना पारदर्शक व गतिमान प्रशासन देण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक प्रभागात खेळाची मैदाने, 24 तास पाणीपुरवठा तसेच बेराेजगार युवकांसाठी काैशल्य विकास प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशी सूचना गडकरी यांनी केली. आपली बस सेवा अधिक लाेकाभिमुख व्हावी या दृष्टीने व्हॅाट्सअॅपद्वारे बसचे तिकीट देण्याचा शुभारंभ हाेत असल्यामुळे शहर अधिक स्मार्ट हाेणार असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल याेजना राबवण्यात येत असल्याचे नीता ठाकरे यांनी सांगितले.