मुंबई, 2 ऑगस्ट (आ.प्र.) :
राज्यातील आराेग्य पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी 80 ट्न्नयांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आराेग्य संस्थांना युद्धपातळीवर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; तसेच बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी राज्यात प्रथमच माेठ्या संख्येने आराेग्य संस्थांचे लाेकार्पण हाेत आहे, अशी माहिती आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राज्यातील आराेग्य उपकेंद्रे, प्राथमिक आराेग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ट्राॅमा केअर युनिट, स्त्री रुग्णालय अशा विविध आराेग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल हाेत आहेत. राज्यातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आणि तातडीच्या आराेग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या राज्य शासनाच्या धाेरणाला यामुळे माेठी चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय आराेग्य अभियान आणि 15व्या वित्त आयाेगाच्या निधीतून उभारण्यात आलेली नवीन प्राथमिक आराेग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ब्लाॅक सार्वजनिक आराेग्य युनिट्सची कामेही पूर्णत्वास आली आहेत. नागपूर, गडचिराेली, सांगली, सिंधुदुर्ग, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांत नवीन आराेग्य सुविधा उभारण्यात आल्या असून, आवश्यक उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रशासकीय पूर्तता करण्यात आली आहे. सर्व संस्था सुरू हाेण्यासाठी सज्ज असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. अनेक वर्षे विविध कारणांनी ज्या आराेग्य संस्थांची कामे रखडलेली हाेती व ज्यांची 80 ट्न्नयांहून अधिक बांधकामे झाली आहेत त्यांना प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या सर्व संस्था आधुनिक सुविधांसह नागरिकांच्या सेवेत दाखल हाेत आहेत. पूर्णत्वास येत असलेल्या उर्वरित आराेग्य संस्थांचेही आराेग्य संवाद यात्रेदरम्यान लवकरच लाेकार्पण करण्यात येणार आहे, असे आबिटकर यांनी सांगितले.