नेपाळमध्ये अडकलेले राज्यातील - पर्यटक सुखरूप : गिरीश महाजन

केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क : पर्यटकांची माहिती देण्याचे आवाहन

    29-Aug-2026
Total Views |

MAH 
मुंबई, 28 ऑगस्ट (आ.प्र.) :
नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत. केंद्राशी सातत्याने संपर्क सुरू असून, यंत्रणा चाेवीस तास सतर्क आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
 
प्रशासनाला 80 जणांची माहिती मिळाली आहे. मात्र, तेथे माेबाइल नेटवर्कची समस्या असल्याने तसेच दूरध्वनी सेवा खंडित झाल्याने संपर्क हाेत नाही.
 
नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांचा शाेध घेत असल्याचे महाजन यांनी सांगितले. आपापल्या जिल्ह्यांमधून त्या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यास सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
 
नागरिकांकडे या संदर्भात अतिर्नित माहिती असल्यास ती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देण्यासाठी वेबसाइटही चाेवीस तास खुली ठेवण्यात आली आहे. हीींिीं:// सशेीरिींळरश्र.ारहरीशेल.ळप/ डरहरूरींरšर्सीश्रष/ या संपर्क स्थळावर माहिती द्यावी.
 
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाइन : 1070 (टाेल-फ्री क्रमांक), नियंत्रण कक्ष +91-9321587143, ई-मेल : लेपीीेंश्रीेेाारहरीरीहीींर.र्सेीं.ळप येथेही संपर्क साधता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.