चाणक्यनीती

    28-Aug-2026
Total Views |
 
Chankya
वाच्यार्थ : ज्याप्रमाणे कुत्रा आपल्या छाेट्याशा आणि वाकड्या शेपटीने आपले गुप्तांगही झाकू शकत नाही आणि अंगावर बसणाऱ्या डास, मच्छरांनाही उडवून लावू शकत नाही, त्याप्रमाणे मानवीजीवन हे विद्येविना निरर्थक आहे.
 
भावार्थ ः मानवीजीवनात विद्येचे महत्त्व चाण्नयांनी सांगितले आहे.
 
1. विद्या ः माणसाला परमेश्वराने बुद्धीची असामान्य अशी देणगी दिलेली आहे. इतर प्राणिमात्रांना तशी देणगी लाभलेली नाही; परंतु ज्ञान मिळविल्याशिवाय बुद्धीचा विकास हाेत नाही. विद्येशिवाय माणूस हा एक प्रकारचे निम्नस्तरावरील जीवन जगताे. त्याला काही समजत नाही, सुचत नाही किंवा व्य्नती म्हणून समाजात मान्यताही मिळत नाही. रस्त्यावर राहणारी माणसे आपण पाहताे आणि पुढे निघून जाताे.