अमेरिकेतील नवीन पिढी आता भरतकाम, विणकाम शिकतेय

    28-Aug-2026
Total Views |
 
yuva
संध्यानंद.काॅम
अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये तरुणांचे छंद झपाट्याने बदलत आहेत. एकेकाळी या इथे बॅचलरेट पार्ट्या, मनाेरंजक उपक्रम लाेकप्रिय हाेते. पण, आता वाढत्या संख्येने तरुण विणकाम, भरतकाम, पुस्तकबांधणी, कागदनिर्मिती व गालिचा विणकाम यांसारखी पारंपरिक काैशल्ये शिकत आहेत.
 
एआयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर मानवी अनुभव व सामाजिक संबंधांचा शाेध घेण्याचा युवा प्रयत्न करत आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
 
मिशिगनमधील ग्रीन डाेअर फाेक स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या गालिचा विणकामाच्या कार्यशाळेत माेठ्या प्रमाणात युवांनी सहभाग घेतला. त्यातील बहुतांशजण 35 वर्षांखालील हाेते. उत्तर कॅराेलिनामधील एका लाेककलेच्या शाळेत तर प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागली आहे. काही वर्षांपूर्वीच्या याच शाळेत पुरेसे विद्यार्थी नसायचे. जाॅर्जटाउन विद्यापीठातील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक कैल न्यूपाेर्ट यांच्या मते, हे पारंपरिक छंद लाेकांना स्वतःशी पुन्हा जाेडत आहेत.
 
यासाठी वेळ, संयम व एकाग्रता आवश्यक असते, जी काैशल्ये डिजिटल जीवनात दुर्मीळ हाेत चालली आहेत. फाेक स्कूल अलायन्सच्या संवाद समन्वयक मेरी सॅनबाॅर्न यांनी सांगितले की, हस्तकला शिकल्याने लाेक समाज आणि पारंपरिक काैशल्यांशी पुन्हा जाेडले जात आहेत.