श्री दासबोध नित्यपाठ

मरोन कीर्ती उरवावी। तो सत्वगुण ।।२।।

    28-Aug-2026
Total Views |
 
RamdasSwami
या आंतरिक सुधारणांबराेबर त्याचे बाह्य जगाशी असलेले वागणेही बदलून जाते असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, ताे सर्व लहानथाेरांशी नम्रतेने आणि मर्यादशील विनयाने वागत असल्याने लाेकांना प्रिय असताे. त्याला काेणी आणि ताेही काेणाला विराेध करीत नाही, भांडणतंटा करीत नाही.
 
उलट काेणी भांडत असेल तर ताे ते साेडविताे.
अडचणीत असलेल्याला मदत करताे. वेळप्रसंगी स्वत: दु:ख साेसून पराेपकार करीत राहताे. त्याला गर्व, अभिमान आणि अहंकार नसताे आणि ऐहिक सुखाबद्दल उदासीनता प्राप्त झालेली असते. त्याच्या या वागण्यामुळे ताे सर्वांना हवाहवासा वाटणारा जनप्रिय हाेताे. श्रीसमर्थांचे हे सांगणे अतिशय माेलाचे आहे. परमार्थ साधना म्हणजे इतरांशी तुसडेपणा नाही तर ममत्वाचे व स्नेहशील वागणे हवे.
 
त्यांचा समुदाय करावा व लाेकमान्यता मिळवावी याबद्दल आग्रह आहे आणि जाे निष्काम, निर्वैर, पराेपकारी असेल ताेच लाेकमान्य हाेऊ शकताे. असा सत्त्वगुणी माणूस जिवंत असताना सर्वप्रिय असताेच, पण ताे मेल्यानंतरही सर्व जण त्याची कीर्ती अखंड गात असतात. सत्त्वगुणी माणूस एकांगी नसून ऐहिक आणि पारलाैकिक दाेन्हीमध्ये असा सत्त्वशील असताे हे आपण मनात बाणलेच पाहिजे! -
 
प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299