कोकण बनणार 'ग्रीन एनर्जी हब' ; विविध प्रकल्प उभारणार

५० हजारांवर रोजगार निर्मिती होण्याची शक्यता

    28-Aug-2026
Total Views |
 
project
रत्नागिरी, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
मुबलक सूर्यप्रकाश, वेगवान सागरी वारे आणि अथांग सागरी मार्ग या काेकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बळावर आता काेकण किनारपट्टी राज्याच्या हरित ऊर्जे च्या विकासाचा मुख्य कणा ठरण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. केंद्राच्या ‘राष्ट्रीय ग्रीन हायड्राेजन मिशन’ आणि महाराष्ट्राच्या ‘हरित ऊर्जा धाेरण 2023’च्या माध्यमातून काेकण परिसराला ‘ग्रीन एनर्जी हब’ म्हणून विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी याेजना पुढे येत आहे.
 
या प्रकल्पांमुळे काेकणात 50 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची अपेक्षा आहे.
आगामी तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत पायाभूत सुविधा आणि विविध ऊर्जा प्रकल्पांची उभारणी हाेणार आहे. या टप्प्यात इंजिनिअर्स, वेल्डर्स, मेकॅनिक्स, तंत्रज्ञ, चालक, तसेच विविध कुशल-अर्धकुशल मनुष्यबळासाठी 20 हजारांहून अधिक प्रत्यक्ष राेजगार उपलब्ध हाेतील.
 
प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर केमिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, तंत्रज्ञ, ऑपरेटर आणि देखभाल विभागातील सुमारे 2 हजार कर्मचाऱ्यांना स्थायी राेजगार मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रीन हायड्राेजन, ग्रीन अमाेनिया आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित तांत्रिक काैशल्यांना त्यामुळे माेठी मागणी निर्माण हाेणार आहे. या प्रकल्पांचा परिणाम केवळ ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही. वाहतूक, लाॅजिस्टिक, केटरिंग, सुरक्षा, दुरुस्ती, सेवा आणि अन्य पूरक व्यवसायांत 30 हजारांहून अधिक अप्रत्यक्ष राेजगार निर्माण हाेण्याची शक्यता आहे. परिणामी, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धाेरणांतर्गत काेकणात 2.76 लाख काेटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, 2030 पर्यंत दर वर्षी 5 लाख टन ग्रीन हायड्राेजन उत्पादनाचे धाेरणात्मक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे.