गणेशोत्सवात महाप्रसादासाठी एफडीएची परवानगी बंधनकारक

    28-Aug-2026
Total Views |

FOOD 
सांगली, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
गणेशाेत्सव ताेंडावर आला असून, तयारीसाठी कार्यकर्त्यांची धांदल सुरू आहे.
या धांदलीत महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) परवानगी घ्यायला विसरून चालणार नाही, कारण यंदा मंडळाच्या महाप्रसादावर या विभागाची नजर असणार आहे.
 
महाप्रसाद बनवणाऱ्या मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी अर्ज करावा, असे निर्देश या विभागाचे सहायक आयुक्त नीलेश मसारे यांनी दिले आहेत.
 
गणेशाेत्सवासाेबतच नवरात्राेत्सवातही महाप्रसादाची धूम असते. गणेश आगमनाच्या पहिल्याच दिवसापासून महाप्रसादांना सुरुवात हाेते. 11 दिवस सतत सर्वत्र महाप्रसाद सुरू असतात. हजाराे भक्तांच्या पंगती उठतात. यंदा यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.
महाप्रसादाच्या परवानगीसाठी ऑनलाइन नाेंदणी करावी. परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.