मुंबई, 27 ऑगस्ट (आ.प्र.) :
चाकण-भाेसरीच्या औद्याेगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेगांसाेबतच्या (एमएसएमई) सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2320.97 काेटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादनक्षमता वाढण्यासाेबतच हजाराे राेजगारांच्या नव्या संधी निर्माण हाेतील आणि ग्राेथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातील औद्याेगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नतकेला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी उद्याेगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्र, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. पी. अनबलगन, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, उद्याेग विभागाचे अवर सचिव विनाेद मेंढे, आयु्नत (एमएसएमई) प्रेरणा देशभ्रतार, विशेष आयु्नत (मैत्री) वैभव वाघमारे, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.
चाकण परिसरातील वाढत्या औद्याेगिक गुंतवणुकीचा उल्लेख करताना सामंत यांनी सांगितले, की उद्याेजकांनी मागितलेली जमीन वर्षभरातच अपुरी पडेल, एवढी माेठी गुंतवणूक या भागात अपेक्षित आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्राधान्याने साेडवण्यात येत असून, राज्य शासन उद्याेजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
चाकण-भाेसरी परिसरातील उद्याेजक राज्याबाहेर स्थलांतरित हाेत असल्याच्या चर्चांही सामंत यांन फेटाळून लावल्या.गुंतवणूक