अॅलर्जीमुळे खोकला जास्त वाढतो

    28-Aug-2026
Total Views |
 
health
आपल्याला खूप काळापासून खाेकला येताे आहे का? कित्येकदा खाेकल्यामागे दडलेले कारण अ‍ॅलर्जी असते. खरे तर अ‍ॅलर्जीमुळे येणारा खाेकला खूपच सामान्य आहे. व नेहमीच यामुळे त्रस्त हाेऊन रुग्ण डाॅ्नटरांकडे जात असताे. ज्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असते त्यांना अ‍ॅलर्जन्स म्हणतात. हे अ‍ॅलर्जन्स अत्यंत सामान्य असतात व बहुधा नुकसान करीत नाहीत. उदा. पराग, बुरशी, पशुत्वचेचा पापुद्रा, धूळ, धूर व कित्येकदा एखाद्या खाद्यपदार्थ वा औषधानेही अ‍ॅलर्जी हाेत असते.
 
थाेड्या थाेड्या वेळानंतर येणारा तीव्र खाेकला श्वसनतंत्रातील व्हायरल संक्रमणामुळे असू शकताे. बहुधा नाकात ड्राॅप टाकल्यानंतर हा येऊ शकताे.
 
नाकाचा राेग : नाकात ड्राॅप टाकल्यामुळे वा सायन्युसायटिसमुळेही दीर्घकाळ राहणारा खाेकला असू शकताे.
कित्येकदा या कारणांसाेबत इतर लक्षणेही असू शकतात. उदा. नाक चाेंदणे वा वाहणे.
पण कधी कधी फक्त खाेकलाच असताे.
शरीराच्या स्थितीतील बदलामुळेही नाेझल अ‍ॅलर्जीने हाेणारा खाेकला जास्त वाढत असताे.
 
पाेट व अन्ननलिकेसंबंधित खाेकला : हा बहुधा पाेटातील आम्ल उलटे वाहिल्यामुळे हाेताे. कित्येकदा अन्न पचवणारे आम्ल खाण्यासाेबत अन्ननलिकेपर्यंत जाते व त्यामुळे छातीत व घशात जळजळ हाेते व खाेकलाही येऊ शकताे.
 
व्हायरलनंतर येणारा खाेकला : उशीरपर्यंत राहणारे व्हायरल श्वसनतंत्र संक्रमणामुळेही खाेकला येताे. अशा बाबींमध्ये खाेकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना कफ दाबणारे औषध म्हटले जाते. हे अशाप्रकारच्या आजारात लाभदायक असते.