1. वनराज सिंह ः हा अत्यंत श्नितशाली असताे. त्याचा थाटही राजेशाही असताे. ताे उगीच कुणाची शिकार करत नाही आणि शिकारही ताे बराेबरीच्या प्राण्यांचीच करताे. जसे की, हत्ती. म्हणून सिंहाप्रमाणे शूरवीराची संगत धरली, तर आपलेही साहस वाढते आणि फलही तेवढेच माेठे मिळते.
2. धूर्त काेल्हा ः काेल्हा हा श्नितहीन प्राणी नेहमीच शिकार मिळविण्यासाठी टपलेला असताे. दुसऱ्याने मारलेल्या शिकारीतील ‘वाटा’ ताे लपून पळवताे. म्हणून काेल्ह्याप्रमाणे भित्र्या, फसवणाऱ्या लाेकांच्या संगतीत राहिल्यास हाती काहीच लागत नाही, केवळ अधःपतनच हाेते.
बाेध ः कुणाच्या संगतीत राहिल्याने काय मिळेल, याचा विचार करूनच गुणिजनांची संगत धरावी.