आज आमची स्थिती कशी झाली आहे पाहा : प्रपंच आम्हाला सुटत नाही; भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे; या प्रपंचावरचे प्रेम न साेडता अम्हाला भगवंताचे समाधान लाभावे, अशी आमची इच्छा आहे. खराेखरच, प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे.
प्रेम ही वस्तू अशी आहे, की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दाेन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दाेन ठिकाणी ठेवता येणार नाही.
आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे; आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच साेडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यत: नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रातसुद्धा हेच सांगितले आहे.
शास्त्र हे अनुभवाचे बनलेले आहे.
आमचा अनुभव आम्ही शास्त्राबराेबर पडताळून पाहात नाही. प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी हाेणार नाही. आज प्रपंचात सुख नाही, हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे, ताे पाहणे अगदी जरूरीचे आहे. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य िफरायला जाताना हातात काठी घेताे, त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे काेणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे.
हा प्रपंच करीत असतानाच त्याची आसक्ती कमी हाेऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रानी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत, आणि त्यासाठी आपले आचार, विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे गरजेचे आहे. प्रपंचात सदाचाराने वागावे.
सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत.
विचाराने अत्यंत पवित्र असावे. काेणाचा द्वेष, मत्सर करू नये, आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. उच्चार तर ार सांभाळले पाहिजेत.
नेहमी सर्वाशी गाेड बाेलावे.
ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेताे, त्या जिभेने दुसऱ्याचे अंत:करण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंत:करण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असताे हे ध्यानात धरा