मुंबई, 26 ऑगस्ट (आ.प्र.) :
केंद्रीय याेजनांसाठी उपलब्ध हाेणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियाेग करून यंदा त्याचे प्रमाण 95 ट्न्नयांपेक्षा अधिक ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागप्रमुखांना दिले.
सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय याेजनांच्या निधीच्या उपलब्धता व विनियाेगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते. राज्याच्या याेजनांना केंद्रीय निधीची जाेड देऊन विकासकामांना गती देण्याचे नियाेजन विभागांनी करावे.
पुढील वर्षी सुमारे 16 ते 17 हजार काेटींचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, त्यातील माेठा हिस्सा भांडवली खर्चाचा आहे.
त्यामुळे विहित मुदतीत निधीचा पूर्ण विनियाेग करण्याची जबाबदारी विभागांनी स्वीकारावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधी रखडत असल्यास त्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्य सचिवांच्या स्तरावर प्रभावी यंत्रणा उभारून दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 96 ट्नके, सहकार-पणन व वस्त्राेद्याेग, गृह विभागाने 99 ट्नके, मृद व जलसंधारणाने 98 ट्नके, कृषी विभागाने 94 ट्नके निधीचा विनियाेग केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.